रामेश्वर मंदिर – Rameshwar Temple, Girye

Rameshwar Temple

Rameshwar Temple -

Shri Dev Rameshwar Temple
श्री देव रामेश्वर मंदिर
Religion
Affiliation Hinduism
District Sindhudurg
Deity Lord Rameshwar (Lord Shiva)
Festivals Mahashivratri
Location
Location Rameshwar Wadi
State Maharashtra
Country India
Architecture
Completed 16th Century
Temple(s) 1
Website
www.shridevrameshwar.org

आता विजयदुर्गावरून परतीचा प्रवास सुरू करून अधांर पडला होता. देवगड मालवण रस्त्याने जाताना रामेश्वर अशी पाटी दिसते. रस्त्याला लागूनच एक-दिड किलोमीटरवर रामेश्वराचे मंदिर होते. आम्ही गाडी फिरवली लगेच. काळोखात गाडीच्या उजेडात आम्ही मंदिर नाहीतर त्याचा कळस तरी दिसतोय काय ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण फोकसमध्ये आम्हाला फक्त प्रवेशद्वार दिसले. आम्ही गेलो तिथे. अगदी प्रवेशद्वारात उभे राही पर्यंत मंदिर काय आम्हाला शोधता आले नाही.

मंदिराचे प्रवेशद्वार एकदम छानसे आहे. वरती दोन हत्ती स्वागताला आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार हे जहाजाची डोलकाठी स्वरूपात आहे. जवळच दोन तोफांचे चौथरे आहेत आणि एका चौथऱ्यावरच तोफ दिसते. २०१४ साली एक तोफ चोरीला गेली. जांभा दगडावर लांबलचक 100-150 मीटरचा खोदलेला  मार्ग आहे.

rameshwar mandir
मंदिराचे प्रवेशद्वार
rameshwar temple malvan
जांभा दगडावरील मार्ग

खाली उतरल्यावर प्रवेशद्वाराजवच एक मोठी घंटा दिसते. पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप यांनी ती अर्पण केलेली आहे.  समोरच प्रवेशद्वाराजवळ सात दिपमाळ आपले लक्ष वेधून घेतात.  श्रीमंत सवाईराव माधवराव पेशवे यांचे सुभेदार गंगाधरपंत भानू (नाना फडणवीसांचे बंधू) यांनी ३०० वर्षापूर्वी मंदिराचे बांधकाम केलेले आहे. पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप यांनी पुर्वेकडील प्रवेशद्वार आणि उत्तरेकडील जांभा दगडातील मार्ग उभारलेला आहे.

rameshwar temple
प्रवेशद्वार (खाली उतरल्यावर)
सरदार आनंदराव धुळप यांनी अर्पण केलेली घंटा
सरदार आनंदराव धुळप यांनी अर्पण केलेली घंटा

मंदिराच्या समोरच रेखीव नंदी आहे. पुर्वी मंदिरात नंदीवर बसलेले श्रीदेव रामेश्वराची चांदीची मूर्ती होती पण ती २००९ साली चोरीला गेली. सध्या मंदिरात पिंडीची पुजा केली जाते. मंदिरासभोवती असणारी दगडी फरसबंदी आणि तटबंदी कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांनी केलेली आहे. जवळच संभाजी आंग्रे यांची समाधी दुर्लक्षीत अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला  रामायण आणि महाभारतावर आधारीत भिंतीचित्रे दिसतात.

नंदी
नंदी
शिवलिँग

दरवर्षी माघ महिन्यात इथे महाशिवरात्रीचा उत्सव असतो. इथून पालखी निघते. मंदिरात असणारे रामेश्वराचे मुखावटे आपले लक्ष वेधून घेतात. सध्या रात्रीच्या वेळेस गावकरी मंदिरात आळीपाळीने राखण करत असतात.

रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या प्रवसाला…

Rameshwar temple photo gallery


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top