Irshalgad Fort- ईरशाळगड किल्ला


Irshalgad Fort - ईरशाळगड किल्ला

Table of Contents

 About Irshalgad – इर्शाळगड किल्ल्याबद्दल

किल्ला एका टेकडीवर आहे, इर्शाळगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 3700 फूट आहे, किल्ल्याचा ट्रेकचा दर्जा अवघड आहे, पायथ्याचे गाव इर्शाळवाडी जिथून ट्रेक सुरू होतो, इर्शाळवाडी गावातून किल्ल्यावर पोहोचायला एक तास लागेल. गडाच्या माथ्यावर राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय इर्शाळवाडीतून करता येते. ट्रेक दरम्यान पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.

इर्शालगड ट्रेक

महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेलच्या मध्ये हा किल्ला आहे. हा प्रबळगडाचा भगिनी किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ मोठे नाही पण खडकात अनेक पाण्याची टाकी आहेत. इर्शाळ पठारापासून शिखरावर जाण्याच्या मार्गावर पाण्याची टाकी आहे. शिखरावर जाण्यासाठी कृत्रिम रॉक क्लाइंबिंग उपकरणे असणे आवश्यक आहे. माथ्यावरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हे किल्ले दिसतात.

इर्शालगड किल्ल्यावर कसे जायचे

रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन कर्जत आहे नंतर खाजगी वाहनाने पायथ्या गावापर्यंत, पनवेल पासून एसटी बस किंवा खाजगी वाहनाने चौक फाटा पर्यंत, मुंबई पासून रस्त्याने अंतर 80 किमी आहे आणि नवी मुंबई पासून ते 45 किमी आहे आणि पुणे ते 116 किमी आहे

 

ईरशाळगड – एक रम्य संध्याकाळ.

उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्या श्वासांची आणि दिवस मावळेल म्हणून ऊर फुटस्तोवर धावताना निघालेल्या घामाच्या धारांची!

रविवारचा दिवस होता आणि मी दिवसभर लोळत होतो. बरेच दिवस काही Thrilling Adventure केलं नाही तर शरीर कस सुस्तावून जातं एकदम. दुपारी 1.00 ला मनात आले कुठेतरी भटकून येऊ.. कंटाळा आलाय… माझा Trek Partner स्वप्निलला विचारू म्हणून call केला… त्याचे उत्तर कधी “नाही” येणार आहे काय?  लगेच जेवण करून 2.00 ला घर सोडलं. पण नक्की जायचं कुठे बेत पक्का नव्हता. भटक्यांना कसली आलीय Planning नी काय… आपली नेहमीची Backpack चेक करून उचलली की सुटलो… फक्त प्रश्न राहतो तो charging चा..!!!

निघताना सरसगड ला जाऊन जायचं असं ठरलं जर जास्तच रात्र झाली आणि बेत फसला तर निदान पालीचा गणपती तरी होईल म्हणून.  पनवेल सोडल्यावर मुंबई-पुणे हायवेला लागल्यावर समोरच ईरशाळगड दिसत होता. जणू म्हणतचं होता माझ्याशी “या… जवळ या… सोबतीला बसून एक निवांत भेट घ्या माझी…” गाडी थोडी बाजूला लावून स्वप्निल आणि माझं मत पक्के झाले. गाडी ईरशाळगडाला वळवली.

संध्याकाळ झाली होती. आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आता स्पर्धा सुर्यदेवाशी होती. तशी अंधारात तर आम्ही Tourch विना पण चालण्याची सवय होती पण आम्हाला उंचावरून सुर्यास्त पाहायचा  होता. आम्ही धावतच सुटलो. वेळ होती 5.05 PM. संध्याकाळच्या वेळेस एक ट्रेकर्स ग्रूप खाली उतरत होता आणि आम्ही वर चढत होतो. त्यातल्या दोन पोरी धापा टाकत खाली उतरताना आमच्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होत्या.  ग्रूपमधली पोरं तर आम्ही येडपटच आहोत अश्या तोऱ्यात आमच्याकडे पाहत होती. ते घसरड्यावरून खाली बसून हळू हळू  खालच्या दिशेला उतरू लागली आणि आम्ही बहुतेक धावतच त्यांच्या बाजूने वर निघून गेलो.

वरती 5.45 PM ला जवळपास आम्ही एका उंच कड्यावर पोहोचलो तिथेच आता संध्याकाळ घालवावी असा बेत केला आणि  सुर्यदेव मावळेपर्यंत छान निसर्गाचा मन भरून आस्वाद घेतला. मी तर छानसा कातळावर आडवा होऊन  निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत होतो. वरून कर्नाळा किल्ला, मुंबई-पुणे हायवे, प्रबळगड, मोरबे धरण, माथेरानसारखा परीसर दृष्टीस पडतो. नंतर काळोख होऊन ही बराच वेळ 7.15 PM पर्यत आम्ही आजूबाजूचा चकाकत्या परीसराचा मन भरून आनंद घेतला आणि पुन्हा Recharge होऊन मुंबई गाठली ती सोमवारच्या नित्य दिनचर्येला!


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top