Asherigad fort – किल्ले अशेरीगड

asherigad fort

किल्ले अशेरीगड - Asherigad fort

Table of Contents

 Asherigad Fort – किल्ले अशेरीगड.

 

उंची – १७०० फुट

जवळचे गाव – खोडकोना, पालघर जिल्हा.

 

सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास… गावातल्या वाघदेवाच्या छप्परवजा मंदिरातला रात्रीचा मुक्काम…   कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री ३.०० वा. शेकोटीसाठी केलेली धावपळ… कोपऱ्यात नं झोपण्यासाठी सिद्धूची उडालेली धांदल…!!!

सकाळचा चिमणी पाखरांचा चिवचिवाट… वाडीत घेतलेला मस्त कोरा करकरीत वाफाळलेला चहा… गड चढताना पावलोपावली यशने मारलेल्या बैठका… मी थकलोच नाही – हे दाखवून देण्यासाठी गौरवने केलेली कलाकारी… नंतर “भाय मी थकलो नाही रे फक्त पाय दुखतायत!” या dialogue मारून सगळ्यांचा पिकलेलेला हश्या…

डोळ्यांत साठवलेले किल्ल्याचे मनमोहक सौंदर्य… झाडाखाली कातळावर आडवे पडून समोरचा नयनमनोहर डोंगर-दऱ्याचे सुख घेत  केलेला आराम… याची feeling इतकी Duplex की पलंगही त्यासमोर वाटेल फिका… 

पुन्हा परतीचा प्रवास… गावातल्या कुडाच्या भिंतीच्या घरात वारली चित्रकलेच्या सानिध्यात उरकलेले पोटभर जेवण… आणि पुन्हा घोड्यांवर स्वार होऊन ७५ च्या Nonstop speed ने गाठलेली मुंबई!
गोराईकर मावळे ट्रेकर्स (GMT) सोबत अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी घेऊन पुन्हा नव्या दमाने आता Office ची सुरवात!

किल्ल्याची माहिती – इतिहास

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येणाऱ्या किल्ल्यांपैकी अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणार्‍या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणार्‍या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले.

पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून १७३७च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.

 

Asherigad Fort Gallery

पहाण्याची ठिकाणे –

१) पडक्या वाड्याचे अवशेष

२) चर असलेले अनेक चौथरे

३) पहारेकरींना झोपण्यासाठी दगडी पलंग

४) तीन तळे


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top