Ghosalgad Fort – घोसाळगड

ghosalgad

Ghosalgad Bhatkanti

Table of Contents

तारीख – 26 मे 2021, शुक्रवार.
उंची 850
जवळचे गाव – घोसाळे
ठिकाण- रोहा, रायगड, महाराष्ट्र.

तर आता या वर्षी एवढ्या कडक उन्हात ट्रेकिंगला जायचं म्हणजे तसं अगदी जिवावरच येत होत, पण नाही नाही करता करता एक छोटासा ट्रेक झालाच. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो आणि तिथूनच माझ्या दोन भावां सोबत म्हणजेच विजय दादा आणि राहूल सोबत घोसाळगडाची भटकंती करून घेतली.

 

ट्रेकक्षितीजच्या माहितीनुसार घोसाळगड हा किल्ला १६व्या शतकात निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

विजय दादा येतोय म्हणून अचानक आम्ही घोसाळगड जायचा बेत पक्का केला. तळा या तालुक्यामार्गे आम्ही घोसाळे गावात आल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली. भवानी मंदिराच्या पाठून किल्ल्यावर जायला पायवाट जाते, तिथून आम्ही  किल्ल्यावर चढायला सुरवात केली. तशी किल्ल्याची उंची लहान असल्याने आम्ही  १२ मिनिटातच तटबंदीपाशी येऊन पोचलो. (आणि त्यातही विजय दादा धापा टाकत होता!)  सोबत असलेल्या विजय दादाचा हा पहिलाच ट्रेक असल्याने त्याला लवकरच वर येऊन हायसे वाटले. तुटलेल्या तटबंदी मधून वर आल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. तेथेच आपल्याला एक चोरदरवाजा दिसून येतो, जो  आपल्याला किल्ल्याच्या विरूद्ध बाजसू घेऊन जातो. समोरच आपल्याला किल्ल्याची माची दिसते तिथे जरीपटका डौलाने फडकत असतो. इथे राहूल तर एकदम selfie काढण्यात मग्न झालेला.

 

ghosalgad
गडावरील तोफ

पायऱ्या चढून वर आलो की, आपण बालेकिल्याजवळ येऊन पोचतो. बालेकिल्ल्याला पायवाटेने गोल प्रदक्षिणा घालू शकतो. तिथे डावीकडून जाणाऱ्या वाटेनी गेलो की उजव्या दिशेला पाण्याचे दोन टाके आहेत. तिथे उन्हाळ्यातही पाणी असते पण ते पिण्यायोग्य नाही. या वाटेने पुढे जाताना चाफ्याची झाडे खुप दिसतात. पुढे डावीकडे एक दरवाजा, पायऱ्या, आणि पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात, पण ते पहायला आपल्याला खालपर्यत यावे लागते. रस्ता थोडा अवघड असल्याने नवख्याने येऊ नये. ही वाट म्हणजे Shortcut असून आपल्याला direct खालपर्यंत घेऊन येते.

ghosalgad chor wat
घोसाळगडा वरील चोरवाट

पुढे चालत गेलो की आपल्याला उजवीकडे एक पडका वाडा दिसतो. थोडे पुढे गेल्यावर शौचकुपाचे अवशेष दिसतात. समोरच आपल्याला एक तोफ दिसते. तोफेचे तोंड मांदाड खाडीच्या दिशेला ठेवण्यात आले आहे. सध्या तरी हिच जागती खुण किल्ल्यावरती अस्तित्वात आहे. तिथल्या माचीवर उभे राहून आपल्याला पूर्वेकडे तळेगड दिसतो. या ठिकाणी आम्ही photography आणि  videography करून घेतली.

आता आम्ही निघालो परतीच्या दिशेला वर सांगितलेल्या कठीण वाटेने आम्ही खालीतरून पायथ्याशी ७-१० मिनिटांत आलो. इथे खाली उतरताना १५ फुटाची उंची आपल्याला झाडाच्या मुळाला पकडून खाली उतरावे लागते. मी पहिला खाली उतरून माझ्यामागून राहुल उतरला आणि शेवटी विजय दादा. इथे विजय दादाचा पहिलाच ट्रेक असल्याने त्याची खाली उतरताना मज्जा आली, पण त्याने मी दिलेल्या instructions नुसार एकदम छानपैकी खाली उतरून दाखवला.

talagad raigad distict
घोसाळगडावरून दिसणारा तळेगड

Ghosalgad कसे पोहचाल?

रायगड मधील रोहा या तालुक्यात यावे. तिथुन रोहा-भालगाव मुरूड या रस्त्याने घोसाळा या पायथ्याच्या गावी यावे.
स्वताचे वाहन असल्यास तळेगड, घोसाळगड, कुडालेणी हे ठिकाणे एकाच दिवसात पाहू शकतो.
मुरूड-जंजिरा कडून येत असाल तर भालगाव मार्गे येवून सोबत कुडा लेणी ही पाहू शकता.

Nearby Spots :-


About The Author

2 thoughts on “Ghosalgad Fort – घोसाळगड”

  1. Pingback: द्रोणागिरी – Dronagiri temple - Mavle Trekkers

  2. Pingback: Talagad - तळागड information in marathi 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top