मावळे ट्रेकर्स
About us
मावळे ट्रेकर्स- Mavle trekkers
“उघडली पेटी पुराणी, गंध दरवळला जुना… तरळला डोळ्यांसमोरी, काळ अवघा तो पुन्हा..!!!”
मावळे ट्रेकर्स –
आपला मावळे ट्रेकर्स (गोराईकर मावळे ट्रेकर्स) ग्रूप २०१४ सालात अस्तित्वात आलेला असून पहिल्याच ट्रेकची सुरवात सिहगडासारख्या ऐतिहासिक गडावरील मातीच्या पदस्पर्शाने केलेली आहे. आपल्या ग्रूपचा पहिला उद्देश हा या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचा पहारेकरी असलेला, अफाट ताकदीचा आणि रौद्र-भीषण वाटत असला तरी तेवढाच मायाळू असलेला सह्याद्रीची आणि त्याचे सखे-सोबती असलेल्या गड-किल्ल्यांची जमेल तशी ट्रेकवारी, भटकंती करणे हा आहे. तसे असले तरी शिवरायांचा आणि मावळ्यांच्या अफाट कर्तृत्वाने आणि त्यांच्या इतिहासाच्या आवडीने प्रेरित होऊन आम्हास या सह्याद्रीच्या कातळ-कड्यांत, डोंगर-दऱ्यांत आणि गड-किल्ल्यांवर भटकंती करण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत.
आजच्या शहरातली यंत्रामागे धावणाऱ्या, मोबाईलमध्ये गुंतणाऱ्या, करीअर आणि अभ्यासाच्या दडपणात धडपडणाऱ्या युवा पिढीला इतिहासाची तसेच ट्रेक सारख्या निसर्गआनंद देणाऱ्या धाडसी व्यायामाची गोडी लागावी हा आमचा दुसरा उद्देश आहे. भटकंती आणि ट्रेकवारी करताना आलेले अनुभव तसेच गड-किल्ल्यांची माहिती, प्रवासवर्णने, आजूबाजूच्या ठिकाणांची प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती तुमच्या समोर ब्लाॕगच्या रुपाने आम्ही सादर करीत राहू.
धन्यवाद. जय शिवराय!

Extraordinary Experiences
Chasing the sunset
Our Core Values
We are Mavle Trekkers
- No littering & nuisance on places we travel or Trek
- We strongly oppose consumption of alcohol / smoking during our events
- Don't harm the wildlife or the enviroment at any costs.