Vijaydurg Fort information in Marathi 2024

Vijaydurg fort

Vijaydurg Fort Informaton in Marathi

नाव विजयदुर्ग (किल्ला)
उंची —-
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी अत्यंत सोपी
ठिकाण देवगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा.
जवळचे गाव विजयदुर्ग
सध्याची अवस्था सुस्थितीत

Vijaydurg Fort

विजयदुर्ग किल्ला हा वाघोटन नदी अरबी समुद्रास मिळते त्याठिकाणी असून मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच,  सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभा ठाकला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी  अस्तित्वात आणलेल्या मराठा आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. किल्ल्याच्या पश्चिमेस भर समुद्राखाली संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

किल्ल्यावर पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी आहे त्यामुळे किल्ल्याच्या आत अजून एक किल्ला असल्यासारखा भास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती करून किल्ल्याची व्याप्ती केली. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची ही तटबंदी आहे. हा किल्ला आजच्या काळात देखील बघितल्यावर अंदाज लावता येतो किल्ला किती अभेद्य असेल! कदाचित यामुळेच टोपीकर याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असावेत.

 Vijaydurg fort weather / हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

Vijaydurg Fort नागरी सुविधा

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास – History of Vijaydurg fort

कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ हा किल्ला बांधला. त्यानंतर यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता.  शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ.स. १६६४ मध्ये जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. शिवाजी महाराजां नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता. इंग्रजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी दोनदा १७१८ आणि १७२० रोजी प्रयत्न केले होते पण दोन्ही वेळेस त्यांना मराठ्यांकडून हार पत्करावी लागली.

इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला. पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली.

इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला याच ठिकाणी हेलियम वायूचा शोध लागला.

पहाण्याची ठिकाणे – Viijaydurg fort

१) हनुमंत दरवाजा –

हा किल्ल्याचा पहिला दरवाजा असून यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. त्याच्या समोरच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूलाच तोफ आहे.

२) जिबीचा दरवाजा –

हनुमंत दरवाज्यातून पुढे गेल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो.

३) तीन तटबंद्या –

किल्ल्याला तीन तटबंदी आहेत. पहिली तटबंदी ३० फूट उंचीची असून दुसरी १० फुटांची आणि तिसरी ३० फूटांची आहे.

४) यशवंत महाद्वार –

दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्या मधे गोमुखी रचनेचे भव्य “यशवंत” महाव्दार आहे.

५) इमारतींचे अवशेष

खलबतखान्याची इमारत, सदरेची इमारत, राणीवसाची इमारत

६) चुन्याचा घाणा –

सदरेची इमारतीपुढे आणि किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस आपल्याला चुन्याचा घाणा पहावयास मिळतो.

७)  बुरूज – Vijaydurg Fort

किल्ल्यात गणेश बुरूज , राम बुरूज, हणमंत बुरूज  आणि दर्या बुरूज, तुटका बुरूज, शिकरा बुरूज, सिंदे बुरूज, शहा बुरूज, व्यंकट बुरूज , सर्जा बुरूज, शिवाजी बुरूज, गगन बुरूज, मनरंजन बुरूज, गोविंद बुरूज अशी बुरूजे आहेत.

 

 

दर्या बुरूज

 

 

खुबलढा बुरूज

८) चोर दरवाजा –

मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो.

९) साहेबांचे ओटे –

इथून इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.

१०) दोन हौद –

पायवाटेने चालत आल्यास डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता.

११) धान्यकोठार –

हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते.

१२) जखीणीचे देऊळ आणि तोफ –

साहेबांचे ओटे आणि धान्यकोठार पाहून झाल्यावर समोरच जखीणीचे देऊळ आणि तोफ आहे.

१३) पाण्याखालील  तटबंदी –

 किल्ल्याच्या पश्चिमेला पाण्याखाली  एक तटबंदी  किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेली असून ती  ३५० फुट  लांब २०-२२ फुट रुंद  असून १५ फुट उंच आहे.  ही दगडी तटबंदी १७ व्या शतकात बांधलेली असावी अशी माहिती गोवा नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी  आणि वेस्टर्न नेवल कमांड यांच्या १९९१ साली केलेल्या  संशोधनातून मिळते.  ही तटबंदी ओहोटीच्या वेळेलाही दिसण्यात येत नाही ही याचे खास वैशिष्ठ आहे. 
 

जवळची ठिकाणे –

१) विजयदुर्ग समुद्रकिनारा
२) विजयदुर्ग बंदर
३) गिर्ये गावाजवळील 
रामेश्वर मंदिर आणि संभाजी आंग्रे यांची समाधी
३) गिर्ये गावातील आनंदराव धुळपांचा वाडा
४) गिर्ये बीच

पोहोचण्याच्या वाटा –

मुंबई ते विजयदुर्ग अंतर हे 415 कि.मी. आहे.

१) गाडीने येताना मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे या फाट्यावरून विजयदुर्गाकडे जाणारा रस्ता आहे.
२) रेल्वेने येताना वैभववाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
3) एसटीची सोय देखील आहे.

राहण्याची आणि जेवणाची सोय –

विजयदुर्गाजवळ हाॕटेल्स आहेत तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
 

विजयदुर्गाचे रहस्य

एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. हि भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही.

 

 स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत हि शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला 


मावळे ट्रेकर्स

 

 

फोटो गॅलेरी

 

 

विजयदुर्ग बीच

 

विजयदुर्ग बंदर


About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top